उत्तर प्रदेशची इथेनॉल उत्पादनात भरारी

लखनऊ: उत्तर प्रदेश देशातील सर्वात मोठे इथेनॉल उत्पादक राज्य म्हणून विकसीत होत आहे. राज्यातील ५४ डिस्टिलरींनी एकूण ५८ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले आहे.

आयएएनएस न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, राज्याने २०२०-२१ या वर्षात ५८ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले आहे. त्यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इथेनॉल विक्रीतून शेतकऱ्यांना ८६४ कोटी रुपये अतिरिक्त पैसे देण्यात आले आहेत. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करून उत्तर प्रदेशने कंद्र सरकारच्या ७५.५८ मिलियन डॉलर परकीय चलनाची बचत केली आहे. त्यातून अर्थव्यवस्थेला बळ मिळाले आहे.
केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण धोरणानुसार उत्तर प्रदेश सरकार कारखानदारांना जादा इथेनॉल उत्पादनास प्रोत्साहन देत आहे. त्यातून अतिरिक्त साखरेची समस्याही सुटणार आहे. भारतात सध्या इथेनॉलची खूप चर्चा सुरू असून गेल्या काही वर्षात या व्यवसायात खूप बदल झाले आहेत.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०१३-१४ या वर्षात इथेनॉल मिश्रण १.५३ टक्के होते. ते वाढून आता २०२०-२१ मध्ये ७.९३ टक्के झाले आहे. अनेक कंपन्यांनी या क्षेत्रात गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. अनेक साखर कारखान्यांनी डिस्टिलरी सुरू करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here