अमरोहा : आगामी गळीत हंगामासाठी ऊसाचा दर किमान ४५० रुपये प्रती क्विंटल करावा, अशी मागणी भाकियूच्या भानू गटाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चौधरी दिवाकर सिंह यांनी धनौरा तालुका क्षेत्रातील वाजिदपूरमध्ये आयोजित बैठकीत केली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच रघुवीर सिंह होते. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली.
याबाबत, अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राष्ट्रीय उपाध्यक्ष दिवाकर सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना ऊस पिकवण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता आगामी हंगामासाठी किमान ४५० रुपये प्रती क्विंटल ऊस दर दिला गेला पाहिजे. याशिवाय मोकाट जनावरे, बिबट्याच्या त्रासापासून शेतकऱ्यांची मुक्तता करण्याची गरज आहे. मोकाट जनावरे पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यांना पकडून गोशाळेमध्ये पाठवा. जिल्हा संरक्षक धर्मवीर सिंह यांनी सांगितले की, राज्यात कुसूम सोलर पॅनल, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी, पंतप्रधान पीक विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा योजना लागू कराव्यात. वीज बिल थकबाकी असली तरी कारवाई करू नये या आदेशाबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सतपाल, अशोक अधाना, महिपाल सैनी, जितेंद्र चौहान, चौधरी दिनेश, महकार सिंह, जयपाल सिंह, वीर सिंह, जगपाल सिंह, चरण सिंह, समर पाल सिंह, अरुण त्यागी, सुनील त्यागी, विपिन सिंह, सीताराम आदी उपस्थित होते.