लखीमपूर खीरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत मतदान करताना NOTA हा पर्याय वापरण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी सांगतिले की, विविध राजकीय पक्षांनी त्यांची फसवणूक केली आहे. काही पक्षांनी आमची फसवणूक केली आहे. तर काही पक्ष निरुपयोगी आहेत असे शेतकरी म्हणाले. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाकडून अपेक्षा ठेवलेली नाही. भाजप, सपा, बहुजन समाज पार्टी, काँग्रेसने खोटी आश्वासने दिली. निवडणुकीच्या दरम्यान आमचा एखाद्या वस्तूसारखा वापर केला गेला असे शेतकऱ्यांनी सांगितले.
बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय किसान कामगार संघटनेचे प्रमुख व्ही. एम. सिंह यांनी सांगितले की, सपा आणि भाजपने आम्हा शेतकऱ्यांना धोका दिला आहे. सपा-राष्ट्रीय लोक दल दलाच्या आघाडीने आणि भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. मग आम्ही त्यांना का पाठबळ द्यावे ? अशी विचारणा त्यांनी केली.