उत्तर प्रदेश बनतेय देशातील डिस्टिलरींचे हब

86
लखनौ : उत्तर प्रदेश आता देशातील डिस्टिलरीज हब म्हणून उदयास येण्यासाठी सज्ज झाले आहे. राज्यात नव्या १८ कंपन्यांनी डिस्टिलरी प्लांटमध्ये गुंतवणूक केली आहे. आतापर्यंत तीन कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. तर १५ कंपन्यांना डिस्टिलरी उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे. इतर तीन कंपन्यांनी डिस्टिलरी प्लांट उभारण्यासाठी गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला आहे. राज्यात डिस्टिलरीजचा व्यवसाय वाढत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती राज्य सरकारच्या प्रवक्त्यांनी दिली.
उपलब्ध माहितीनुसार, राज्यात गेल्या पाच वर्षांत ५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून १९ डिस्टिलरी सुरू करण्यात आल्या. तर, सुमारे ४,००० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले आणखी १८ डिस्टिलरी प्लांट लवकरच उत्पादन सुरू करतील. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये १६७ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे मद्य आणि ३,५३७ कोटी रुपयांचे इथेनॉल राज्यातून निर्यात करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here