उत्तर प्रदेश : सहकारी साखर कारखाना सोसायट्यांमध्ये फार्म मशिनरी बँकेची स्थापना

लखनौ : उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने कोणतीही कसर सोडलेली नाही. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. ऊस विभागाच्या म्हणण्यानुसार, विशेषत: छोट्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस सोसायट्यांकडून वाजवी दरात भाड्याने उपकरणे मिळाल्याने फायदा होत आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या फार्म मशिनरी बँकेत अत्याधुनिक कृषी उपकरणे उपलब्ध आहेत.

विभागाच्या प्रयत्नांमुळे ऊस लागवडीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढत आहे. आतापर्यंत २५,०३१ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्याचा चांगला उपयोग केला आहे.राज्यात उसाची उत्पादकता सातत्याने वाढत आहे. गेल्या सहा वर्षांत ऊसाची उत्पादकता प्रती हेक्टर ७४२ क्विंटल होती, तर २०२२-२३ मध्ये ती प्रती हेक्टर १११ क्विंटलने वाढून ८५३ क्विंटल प्रती हेक्टर झाली. खोडवा उसाची उत्पादकताही प्रती हेक्टर १२० क्विंटलने वाढून ८२४ क्विंटल प्रती हेक्टर झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here