उत्तर प्रदेश: ऊस दर जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे धरणे

मेरठ : ऊस दर निश्चित न झाल्याने संतप्त झालेल्या भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यानी दौराला साखर कारखान्यासमोर धरणे आंदोलन केले. सरकार शेतकऱ्यांची दुजाभाव करीत आहे. निवडणुकीवेळी देण्यात आलेली आश्वासने सरकार विसरले आहे. ही आश्वासने पूर्ण केली जात नाहीत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी सांगितले की, कारखाने सुरू होवून तीन महिने उलटले आहेत. मात्र, सरकारने अद्याप ऊस दर निश्चित केलेला नाही. त्यामुळे आंदोलन करावे लागत आहे. दुसरीकडे मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान केले जात आहे. तक्रारींनंतरही या जनावरांचा बंदोबस्त करण्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. भारतीय किसान युनियनचे नेते, अनुराग चौधरी म्हणाले, शेतकऱ्यांना दिलेली कोणतीही आश्वासने सरकारने पाळलेली नाहीत. वेळेवर ऊस बिले मिळत नाहीत, थकीत ऊस बिले देण्याकडेही डोळेझाक केली जात आहे. शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. राकेश टिकैत यांच्या आवाहनानुसार, मुजफ्फरनगर येथील महापंचायतीनंतर धरणे आंदोलन केले जात आहे. समस्यांची सोडवणूक होईपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here