उत्तर प्रदेश सरकारकडून उच्चांकी ऊस बिले अदा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारने आपल्या कार्यकाळात उच्चांकी ऊस बिले अदा केल्याचा दावा केला आहे. सरकारने आतापर्यंत ४५.४४ लाखांहून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १,३७,५१८ कोटी रुपये दिले आहेत. ही रक्कम बसपा सरकारच्या तुलनेत दुप्पट आणि समाजवादी पक्षाच्या सरकारच्या कार्यकाळापेक्षा दीडपट आहे.

बसपाच्या सरकारच्या काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ५२,१३१ कोटी रुपये देण्यात आले होते. तर समाजवादी पार्टीच्या सरकारच्या पाच वर्षांच्या काळात ९५,२१५ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.

योगी सरकारच्या कार्यकाळात अखिलेश सरकारच्या कालावधीच्या तुलनेत ऊस उत्पादकांना १०६६१.०९ कोटी रुपये थकबाकी दिली आहे असे राज्य सरकारच्यावतीने सांगण्यात आले. गेल्या सरकारच्या काळात साखर कारखाने एका पाठोपाठ बंद पडले. हे कारखाने सुरू करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. याशिवाय योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशला साखर उत्पादनात देशात अव्वल बनवले आहे.

राज्यात २०१७-१८पासून ३१ जानेवारी २०२१ पर्यंत ५४ डिस्टिलरींच्या माध्यमातून २८०.५४ कोटी लीटर इथेनॉल उत्पादन करण्यात आले आहे. गेल्या २५ वर्षात प्रथमच २६७ नव्या खांडसरी युनीटना परवाने देण्यात आले आहेत. यापैकी १७६ युनीट सुरू झाले आहेत. या युनीटसाठी ३८८ कोटी रुपये गुंतवणूक झाली असून २० हजार लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here