उत्तर प्रदेश सरकारकडून ऊस दर वाढीसाठी प्रक्रिया सुरू

143

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील ऊस दर वाढीबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. ऊसाच्या दराबाबत शेतकरी आणि साखर कारखाना संघासह सर्व संबधित घटकासोबत राज्य सल्लागार समितीने एक उच्चस्तरीय बैठक घेतील. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात येथे शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळासोबत चर्चे करताना सरकार लवकरच उसाच्या एसएपीमध्ये वाढ करेल असे स्पष्ट केले होते.

पुढील ऊस हंगाम पश्चिम यूपीमध्ये २० ऑक्टोबरपासून सुरू होईल. तर मध्य यूपीमध्ये हा हंगाम २५ ऑक्टोबरला सुरू होईल. तर पूर्व विभागात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गळीत हंगामाला सुरुवात होणार आहे. सध्याचे सरकार सत्तेवर आल्यानंतर लगेच २०१७ मध्ये सरकारने एसएपीमध्ये १० रुपये प्रती क्विंटलची वाढ केली होती. सध्या एसएपी ३२५ रुपये प्रती क्विंटल आहे. त्यामध्ये २०१७ पासून सुधारणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी विधानसभेत आणि बाहेरही राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

याबाबत हिंदूस्थान टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार मुख्य सचिव राजेंद्र कुमार तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांकडे एसएपीमध्ये गेली चार वर्षे बदल झाला नसल्याची वस्तूस्थिती मांडली. त्यामुळे एसएपी ४०० रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणी केली. मात्र, या मागणीला कारखाना प्रतिनिधीनी कडाडून विरोध केला. शेतकऱ्यांची मागणी ४०० रुपये प्रती क्विंटल दर करावा अशी असेल तरी हा दर कारखान्यांना परवडणारा नसल्याचे त्यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here