उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांकडून मका, बाजरीची करणार खरेदी 

लखनौ : उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार प्रथमच मक्यासह ‘बाजरी’ खरेदी करणार आहे. खरीप विपणन वर्ष २०२२-२३ मध्ये किमान आधारभूत किमतीवर खरेदी केली जाईल. बाजरी खरेदी हा भरड धान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या योजनेचा हा एक भाग आहे. बाजरीची किमान आधारभूत किंमत २३५० रुपये प्रती क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. सरकार अलिगढ, हाथरस, कासगंज, एटा, आग्रा, फिरोजाबाद, मथुरा, मैनपुरी, बरेली, बुदौन, संभल, बुलडशेर, कानपूर देहाट, ओरैय्या, इटावा, जालोन, प्रयागराज आदी जादा उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यांमधून १५ ऑक्टोबरपासून धान्य खरेदी सुरू करेल.
सद्यस्थितीत गहू आणि भाताच्या तुलनेत भरड धान्यांना कमी पाणी लागत असल्याने आणि उत्पादन खर्चाच्या दृष्टीने ती अधिक किफायतशीर असल्याने, शेतकऱ्यांना मका, ज्वारी, बाजरी आणि बार्ली यांसारखी प्रमुख तृणधान्ये उत्पादनास प्रोत्साहन दिले जात आहे, असे राज्य सरकारने सांगितले. शेतकऱ्यांना अधिक मोबदला देण्यासाठी भरडधान्य खरेदी केला जात असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा आयुक्त, सौरभ बाबू यांनी दिली. सरकारच्या प्रयत्नांमुळे राज्यात बाजरीची लागवड वाढत आहे. उत्तर प्रदेशला एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. त्यासाठी सरकार पावसावर आधारित शेती प्रणालीअंतर्गत बाजरीची लागवड पुनरुज्जीवित करण्यासाठी ठोस प्रयत्न करत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here