उत्तर प्रदेशमध्ये गेल्या हंगामाच्या तुलनेत आतापर्यंत कमी साखर उत्पादन

देशभरात साखर कारखाने आता पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत गेल्या हंगामाच्या तुलनेत कमी साखर उत्पादन झाले आहे.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत १०१ साखर कारखआने गाळप करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत १०.३९ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत उत्तर प्रदेशामध्ये १११ साखर कारखाने सुरू होते. त्यांनी १२.६५ लाख टन साखर उत्पादन केले होते.

दुसरीकडे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात चालू हंगामात आतापर्यंत गेल्यावर्षीपेक्षा अधिक साखर उत्पादन झाले आहे. इस्माने दिलेल्या माहितीनुसार, १७२ साखर कारखान्यांनी ३० नोव्हेंबर २०२१ अखेर राज्यात २०.३४ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्यावर्षी समान कालावधीत १५.७९ लाख टन साखर उत्पादन झाले होते. महाराष्ट्रात गाळप हंगाम लवकर सुरू झाला आहे. चांगल्या उसाची उपलब्धता असल्याने साखर उत्पादन वाढले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here