उत्तर प्रदेश: साखर कारखान्यांकडून सॅनिटायझरचे उच्चांकी उत्पादन

लखनौ : उत्तर प्रदेशच्या उत्पादन शुल्क विभाग आणि ऊस विभागाने कोरोना व्हायरसला पसरण्यापासून रोखण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझर उत्पादन सुरू केले आहे. सॅनिटायझर उत्पादन सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या बाबत माहिती देताना उत्पादन शुल्क विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, राज्यात कोविड १९चा फैलाव पसरल्याने हॉटेल, रेस्टराँ, उद्योग, दुकाने आदी आर्थिक घडामोडींना मोठा फटका बसला. अशा काळात हँड सॅनिटायझरची मागणी वाढली. उत्पादन शुल्क विभाग आणि ऊस विभागाने याचा पुरवठा करण्याची जबाबदारी घेतली आणि त्यासाठी प्रयत्न केले.

उत्तर प्रदेशमध्ये साखर कारखाने, डिस्टिलरी, इतर युनिट्सना सॅनिटायझर बनविण्यासाठी तातडीने परवाने देण्यात आले. त्यामुळे राज्यात ९७ युनिट्सनी सॅनिटायझर उत्पादन सुरू केले. राज्यात आतापर्यंत २०६.२५ लाख लिटर सॅनिटायझरचे उत्पादन झाले आहे. त्यापैकी १९२.४४ लाख लिटर पॅक्ड सॅनिटायझर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.
भुसरेड्डी म्हणाले, त्यांच्या निर्देशानंतर सॅनिटायझर युनिट्सनी अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही सॅनिटायझर दिले. जिल्हा प्रशासन, पोलिस, नगरपालिका, आरोग्य कर्मचारी आदींना मोफत सॅनिटायझर देण्यात आले. तर कंपन्यांनी सरकारी कार्यालये, हॉस्पिटल्ससह सामाजिक संघटनांना ४,०१ लाख लिटर सॅनिटायझरचे पॅक मोफत उपलब्ध करून दिले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here