उत्तर प्रदेश: ऊस नर्सरीच्या माध्यमातून महिला स्वयंसाह्यता गटांचे उत्पन्न वाढले

88

लखनौ : ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेश सरकारने नर्सरीत ऊसाची रोपे उगवण्यासाठी महिला स्वयंसाह्यता गटांची मदत घेतली आहे. ऊस बिज नर्सरीत आणि त्याचे वितरण यामध्ये उत्तर प्रदेशात ३४०० महिला स्वयंसाह्यता गटांशी संलग्न ५९,००० हून अधिक महिलांचे आर्थिक, सामाजिक उत्थान होत आहे. या महिलांनी एकडोळा आणि बड चीप तंत्राने २४.४१ कोटींहून अधिक रोपे तयार केली आहेत.

द पायनिअरमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशनअंतर्गत महिला स्वयंसहायता समुहांना बँकांकडून कर्ज देऊन आणि त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यात आले आहे. ऊस शेतीमधून महिलांच्या रोजगारवाढीसाठी प्रयत्न करताना सरकारने या महिलांच्या उत्पन्नात वाढ करणे, त्यांच्या जीवनाचा स्तर सुधारणे असा हेतू ठेवला आहे. उत्तर प्रदेशात ऊस शेसाठी २७ लाख हेक्टर जमीन वापरली जाते. ग्रामीण महिलांच्यावतीने प्रगत बियाण्यांचे वितरण हे यशाचे द्योतक बनले आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यातील ३७ ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये ३,००४ महिला स्वयंसाह्यता गट तयार करण्यात आले आहेत. महिला उद्योजकांनी एकत्र केलेल्या या समुहांच्या माध्यमातून २४ कोटी रुपयांहून अधिक रोपांचे उत्पादन करण्यात आले आहे. त्यातून त्या प्रत्येक समुहाला सरासरी १.७० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.

याशिवाय, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना महिला स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेल्या रोपांपासून एकूण १.७० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. या योजनेच्या माध्मयातून आतापर्यंत ५८,९०५ ग्रामीण महिलांना स्वयंरोजगार देण्यात आले आहेत. एकूण १,५२,४४० कामकाजाचे दिवस रोजगार मिळाले आहेत. यासाठी उत्तर प्रदेश ऊस विभाग राष्ट्रीय अन्न संरक्षण धोरणांतर्गत महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यातून चांगले बियाणे वापरुन त्या नर्सरी तयार करतील. ऊस शेतीतून महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी मिळत आहेत. साखर कारखान्यांच्या माध्यमातून महिलांसाठी यासाठी अनुदानीत स्वरुपात मशीन, उपकरणे दिली जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here