उत्तर प्रदेश: पूर्वांचलमधील ऊस शेतीत मोठी वाढ

116

लखनऊ: पूर्वांचलमधील ऊस लागवडीच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षामध्ये ऊसाच्या शेतीचे क्षेत्र १.३४ लाख हेक्टरने वाढले आहे अशी माहिती ऊस विभागाने दिली.

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, एका सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, २०१७ मध्ये पूर्वांचल परिसरात ऊस शेतीचे क्षेत्र ४.३९ लाख हेक्टर होते. ते वाढून आता ५.७३ लाख हेक्टर झाले आहे. ऊस विभागाकडील आकडेवारीनुसार, या कालावधीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात प्रती हेक्टर २२,००० रुपयांची वाढ झाली आहे. तर पूर्वांचलमधील शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात १२९० कोटींची वाढ नोंदवली गेली आहे.

सरकारी प्रवक्त्यांनी सांगितले की, सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना लागू केल्याचा परिणाम या उत्पादनात वाढीत दिसून येत आहे. त्यांनी सांगितले की, नव्या साखर कारखान्यांची स्थापना, बंद पडलेले कारखाने सुरू करणे, कोरोना महामारीच्या काळात कारखान्यांचे व्यवस्थापन, शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेवर देणे आणि शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी जोडणारे अभियान यामुळे शेतकऱ्यांचे हीत साधले गेले आहे. गेल्या चार वर्षात पूर्वांचलमध्ये उसाचे सरासरी उत्पादन ६५२.७२ क्विंटल प्रती हेक्टरवरून ७२२ क्विंटल प्रती हेक्टर झाले आहे. उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना ७० लाख क्विंटल बियाणे वितरीत केले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here