नव्या गाळप हंगामापूर्वी, उत्तर प्रदेशामध्ये जवळपास 8,400 करोड रुपयांची थकबाकी

147

लखनऊ: उत्तर प्रदेशामध्ये नव्या गाळप हंगामाचा बिगुल वाजला असून, अजूनपर्यंत ऊस थकबाकी पूर्णपणे भागवण्यात आलेली नाही. राज्यातील साखर कारखाने लॉकडाउनच्या परिणामातून अजूनही बाहेर आलेले नाहीत. साखर कारखान्यांकडून 8,447 करोड रुपये देय आहेत. ही बाकी 2018-19 हंगामाच्या 4,942 करोड रुपयांच्या तुलनेत अधिक आहे. उत्तर प्रदेशातील ऊस विकास आणि साखर उद्योग विभागाकडून प्रसारित अहवालानुसार, हंगामांच्या शेवटपर्यंत, कारखान्यांनी शेतकर्‍यांकडून पुरवण्यात आलेंल्या 35,898 करोड किमतीच्या ऊसापैकी केवळ 76 टक्के थकबाकी भागवली होती.

शेतकर्‍यांनी सांगितले की, ऊस थकबाकी न मिळाल्याने ते आर्थिक संकटात आहेत. सरकारनेही प्रशासनाला आदेश दिले आहेत की, थकबाकी भागवण्यात अपयशी साखर कारखान्यांवर कारवाई केली जावी. साखर कारखान्यांनी सांगितले की, लॉकडाउनमुळे त्यांची आर्थिक स्थिती खराब आहे, तसेच साखर न विकल्याने ते उत्पन्न संग्रह करु शकत नाहीत आणि त्यामुळे ऊस थकबाकी भागवण्यात विलंब होत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here