ऊस उत्पादक शेतकर्यांनी हक्काचे पैसे मागितल्यावर मिळाला लाठीचा मार 

 

बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे, आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच

बिजनौर (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी

थकीत ऊस बिल प्रकरणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांवर येथे पोलिसांनी लाठिमार केला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आझाद किसान युनियनच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी आवाहनाला प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

आझाद किसान युनियनचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी म्हणाले, ‘तीन साखर कारखान्यांतून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चिता उभी करून त्यात सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. त्यावेळी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांवर पाणी फवारण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला.’ जिल्हा प्रशासनाने लाठीमार करण्याचा आदेश देऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे. पण, शेतकऱ्यांची देणी लवकरात लवकर भागवण्यात आली नाहीत तर, आणखी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांचे सामूहिक आत्मदहन रोखण्यासाठी त्यांच्यावर पाणी मारण्यात आले. कायदा आत्मदहन करण्याची अनुमती देत नाही. त्याचवेळी लवकरात लवकर शेतकऱ्यांची देणी भागवण्यात येतील, असा विश्वास जिल्हाधिकारी अटलकुमार रॉय यांनी व्यक्त केला.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here