उत्तर प्रदेश : सत्ता आल्यास ऊस दर ४०० रुपये करण्याची प्रियंका गांधींची घोषणा

लखनौ : पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी अनेक घोषणा केल्या. काँग्रेस सत्तेवर आल्यास वीस लाख नोकऱ्या दिल्या जातील. आणि प्रत्येक जिल्ह्यात एक मॅन्युफॅक्चरिंग हब असेल. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद मध्ये प्रतिज्ञा रॅलीत त्या बोलत होत्या.

प्रियंका म्हणाल्या, काँग्रेस विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवेल. सत्तेवर आल्यानंतर वीस लाख युवकांना नोकऱ्या दिल्या जातील. खतांची टंचाई असल्याने शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. जर आमची सत्ता आली तर आम्ही भात, गव्हाची एमएसपी वाढवून २५०० रुपये प्रती क्विंटल तर उसाचा दर ४०० रुपये प्रती क्विंटल केला जाईल.

त्या म्हणाल्या, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी देण्यासाठी ४,००० कोटी रुपयांची गरज आहे. मोदी यांनी गेल्या वर्षी कोविड १९ महामारीच्या काळात ८,००० कोटी रुपयांचे खासगी विमान खरेदी केले. केंद्र सरकारने संसदेच्या सौंदर्यीकरण करण्यासाठी २०,००० कोटी रुपये खर्च करत आहे. मात्र, शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत अशी टीका त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here