उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात बनवले नवे रेकॉर्ड

लखनऊ: कोरोना संकटाने साखर उद्योगासमोर मोठ्या अडचणी निर्माण केल्या आहेत. पण तरीही साखर कारखाने या संकटाचा सामना करत ऊस गाळपात मग्न आहेत. उत्तर प्रदेशात आताही अनेक साखर कारखाने सुरु आहेत.

यंदाच्या हंगामात अधिक उत्पादन मिळाल्याने उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी साखर उत्पादनामध्ये नवे रेकॉर्ड केले आहे. इस्माच्या आकड्यांनुसार उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी 15 मे 2020 पर्यंत 122.28 लाख टन साखरेचे उत्पादन केले, जे गेल्या वर्षी या तारखेला उत्पादित झालेल्या 116.80 लाख टन साखर उत्पादनाच्या तुलनेत 5.48 लाख टन जास्त आहे. हे उत्पादन राज्यातील आतापर्यंतचे सर्वात जास्त साखर उत्पादन आहे, जे 2017-18 च्या साखर हंगामामध्ये उत्पादित 120.45 लाख टनापेक्षा अधिक आहे. यावर्षी संचालित 119 कारखान्यांपैकी 73 कारखान्यांनी आपले गाळप कार्य संपवले आहे. आणि 46 कारखान्यांनी आपले कार्य अजूनही सुरु ठेवले आहे, तर गेल्या वर्षी 15 मे 2019 ला 28 कारखाने सुरु होते.

पूर्व उत्तर प्रदेशातील कारखान्यांनी गाळप यापूर्वीच बंद केले आहे. सेंट्रल उत्तर प्रदेशामध्ये जवळपास 40 टक्के कारखाने सुरु आहेत, तर पश्‍चिम उत्तर प्रदेशामध्ये जवळपास 70 टक्के कारखाने सुरु आहेत. अधिकांश ऑपरेटिंग कारखाणे या महिन्याच्या अखेरपर्यंत बंद होण्याची शक्यता आहे, तर काही जून 2020 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरु राहू शकतील.

राज्यामध्ये गाळप हंगाम थोडा लांबला आहे. कारण लॉकडाउन मुळे अधिकतर गुऱ्हाळ उद्योग बंद झाला आहे. आणि येथील ऊस कारखान्यांना पाठवला आहे. ज्यामुळे कारखान्यांजवळ या हंगामात अधिक ऊस गाळपासाठी आला आणि साखर उत्पादनामध्येही वाढ दिसून आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here