ऊस मंत्र्यांनी लोकांना कोरोना विषाणूच्या धोक्याबद्दल जागरूक केले

शामली : उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री सुरेश राणा यांनी नगर पंचायतीच्या तीन सदस्यांच्या शपथ ग्रहण समारंभात लोकांना कोरोना वायरस च्या धोक्यापासून जागरुक केले. तसेच त्यांनी अन लॉक- 1 आणि लॉक डाउन च्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले .

गुरुवारी नगर पंचायतीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, संपूर्ण देशात मोदी आणि योगी यांच्यासारखा कार्यकाल भविष्यात कधीतरीच येईल. नगर पंचायती मध्ये यूपी सरकारकडून तीन सदस्यांना नॉमिनेट करण्यात आले होते, ज्यांचा शपथ ग्रहण सोहळा थाना भवन नगर पंचायत टाऊन हॉल मध्ये झाला. ज्यामध्ये एस डीएम मणी अरोडा यांनी निवडलेले तीन सदस्य अनीता सैनी, प्रेमचंद, विशाल गोयल यांना गोपनियतेची शपथ दिली. कार्यक्रमात ऊस मंत्री सुरेश राणा देखील सहभागी होण्यासाठी आले. त्यांनी तीनही सदस्यांचे अभिनंदन केले आणि सांगितले की, कोरोनाशी लढण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करत आहे. त्याबरोबरच सरकारला साथ देण्यासाठी लोकांनीही सोशल डिस्टन्सीग आणि लॉक डॉउन च्या नियमांचे पालन करावे.  कार्यक्रमात कॅबिनेट मंत्र्यांनी सुका आणि ओला कचरा वेगळा वेगळा करण्यासाठी मागवलेल्या 5 कचऱ्याच्या गाडयांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here