साखर कारखान्यांकडून ऊस शेतकर्‍यांचे 15000 करोड रुपये थकीत

लखनऊ: देंशामध्ये ऊस गाळप संपत आला आहे. आणि सध्या केवळ उत्तर प्रदेशातील काही कारखान्यांमध्ये गाळप सुरु आहे. साखर कारखाने कोरोनामुळे आर्थिक समस्यांशी झुंजत आहेत आणि यामुळे ऊस थकबाकी भागवण्यात अयशस्वी राहिले आहेत.

प्रदेशामध्ये 119 साखर कारखान्यांकडून 112 करोड क्विंटल ऊसाच्या विक्रमी गाळपासह कारखान्यांकडून ऊस शेतकर्‍यांचे जवळपास 15,000 करोड रुपये देय आहेत. ऊस विभागाजवळ उपलब्ध आकड्यांनुसार, साखर कारखान्यांनी आतापर्यंत 40 लाख शेतकर्‍यांना 20,489 करोड रुपये भागवले आहेत. आणि आता ही 15,040 करोड भागवणे बाकी आहे.

भारतीय किसान यूनियन (बीकेयू) चे युवा अध्यक्ष दिगंबर सिंह यांनी सांगितले की, थकबाकी भागवण्यात उशिर झाल्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यांनी ऊसाच्या पिकांवर खूप पैसा खर्च केला आहे. पण आता त्यांच्याकडे पैसा नाही आणि बँकांकडून कर्जासाठी त्यांच्यावर बळजबरी केली जात आहे. शेतकर्‍यांनी लॉकडाउन दरम्यान सरकारला सहकार्य केले आणि आपल्या थकबाकी साठी विरोधही नाही केला. पण लॉकडाउन संपल्यानंतरही, कारखाने थकबाकी द्यायला तयार नाहीत. ज्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. आणि त्यांच्याजवळ आंदोलनाशिवाय पर्याय नाही. सिंह म्हणाले, आम्ही सर्व जिल्हाध्यक्षां बराबेर 16 जून ला व्हर्च्यूअल मिटिंग करणार, ज्यामध्ये आंदोलन सुरु करण्याच्या कार्यक्रमाबाबत त्यांच्या सुचना घेतल्या जातील.

सरकारही सातत्याने ऊस थकाबाकी लवकरात लवकर भागवली जाण्यासाठी प्रयत्न करत आहे

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here