उत्तर प्रदेश: राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची साखर कारखान्यांची मागणी

लखनौ : यंदा घटलेला साखर उतारा, डिझेलच्या दरात झालेली वाढ या कारणांमुळे साखरेच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे देण्यात अडचणीत येत असल्याचे साखर कारखानदारांचे म्हणणे आहे. राज्य सरकारने साखर कारखान्यांना यासाठी मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश सरकारने यंदाच्या साखर हंगामामध्ये, (ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१) उसाची राज्य निर्धारीत किंमत वाढवलेली नाही. साखर कारखान्यांना ३१५ रुपये क्विंटल या दरानेच शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत.
उत्तर प्रदेश शुगर मिल्स असोसिएशनने (यूपीएसएमए) मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी दीर्घकाळ चालणाऱ्या गळीत हंगामासोबतच हवामान बदलामुळे साखरेच्या उताऱ्यात घट झाली आहे. साखरेचा उतारा आणखी अर्ध्या टक्क्याने घटण्याची शक्यता असल्याचे ऊस क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे गेल्या हंगामाच्या तुलनेत यावर्षी साखरेचा उत्पादन खर्च सरासरी १५० रुपये क्विंटल वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here