इथेनॉल समिश्रण १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची उत्तरप्रदेश मधील साखर कारखान्यांची मागणी

लखनऊ : चीनी मंडी

लॉक डाउनमुळे तेल कंपन्यांच्या कमी मागणीमुळे इथेनॉलची विक्री कमी झाली आहे. उत्तर प्रदेश साखर कारखाना असोसिएशन (UPSMA) ने यासाठी केंद्र सरकारकडून 10% इथेनॉल सम्मिश्रण वाढवून 15% करण्याची आग्रही मागणी केली आहे. उत्तर प्रदेश देशात इथेनॉल उत्पादनात अग्रेसर आहे. UPSMA चे जनरल सेक्रेटरी दीपक गुप्तारा यांच्या द्वारे खाद्य व सार्वजनिक वितरण सचिव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सर्वात प्रतिकूल परिस्थितीतही यूपीमध्ये शेतकऱ्यांचे हित जोपासण्यात साखर उद्योग पुढे आहे. पण यावेळी, उद्योग एका संकटातून जात आहे.

गुप्तारा यांनी सांगितले, पांढऱ्या साखर विक्रिवर नकारात्मक प्रभाव पडला आणि आणि बंदरांवर पाठवण्याच्या च्या समस्येमुळे कच्च्या साखरेच्या निर्यातीतही घट झाली आहे. लॉकडाउन दरम्यान डीजेल आणि पेट्रोल च्या कमी मागणीमुळे ‘ओएमसी’ द्वारा इथेनॉल ची मागणी खूपच कमी झाली आहे.
अलीकडेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फेब्रुवारी मध्ये बजेट दरम्यान राज्य विधान सभेला सूचित केले होते की, राज्यातील इथेनॉल क्षमता वाढली आहे, ज्यामुळे देश प्रमुख इथेनॉल उत्पादक म्हणून पुढे आला.

साखर कारखान्यांचे म्हणणे आहे की, मागणी कमी झाल्यामुळे त्यांना इथेनॉल चा साठा करण्यात अडचणी येत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here