पिलिभीत : उत्तर प्रदेशातील ४८ लाखांहून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खुल्या बाजारातून स्वस्त दरात गुणवत्तापूर्ण किटकनाशके देण्यासाठी राज्यातील ऊस अधिकाऱ्यांनी योजना तयार केली आहे. त्या अंतर्गत साखर कारखाने ऊस उत्पादकांना २० टक्के सवलतीवर ब्रँडेड किटकनाशके उपलब्ध करून देतील. उत्तर प्रदेशच्या ऊस विकास आणि साकर उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय आर. भुसरेड्डी यांनी सांगितले की, कारखाने अशी उत्पादने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्त व्याजही देतील. भूसरेड्डी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशमध्ये ही अशा प्रकारची पहिलीच योजना आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही योजना ऊस उत्पादकांना आपल्या पिकातील शूट बोरर, टॉप बोरर अशा किडींपासून वाचविण्यासाठी तयार करण्यात आली आहे. कारखाने थेट कंपन्यांकडून किटकनाशके खरेदी करतील. त्यामुळे त्याचे दर स्वस्त असतील. शेतकऱ्यांना पेरणी हंगामात त्यांच्या शेतातील गरजेनुसार फक्त एकदा किटकनाशक दिले जाईल. त्याच्या गुणवत्तेची देखरेख किटकनाशक अधिनियम १९६८ च्या अंतर्गत केली जाणार आहे. यासोबतच कोणत्याही कारखान्याला कोणत्याही औषधाच्या ‘क्लोरएन्ट्रानिलिप्रोल’ अथवा अशा प्रकारचे किटकनाशक वितरीत करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
भुसरेड्डी म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह किटकनाशक वितरण योजनेसाठी उत्पादकांची यादी साखर कारखान्याच्या मालकांकडून जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिली जाईल. ते म्हणाले, साखर कारखान्यांना ५ लाक रुपयांची बँक हमी जमा करावी लागेल. जर एखादा कारखाना शेतकऱ्यांचे व्याजमुक्त कर्ज समायोजित करण्यात अपयशी ठरला तर संबंधित रक्कम गरजुंसाठी वापरली जाईल.