उत्तर प्रदेश : गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये आतापर्यंत ५०३०.३ कोटींची ऊस बिले अदा

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, २९ डिसेंबर २०२१ अखेर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या गळीत हंगामात ५,०३०.०३ कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत. यासोबतच, राज्य सरकारने एकूण १,५०,७१२.०४ कोटी रुपयांहून अधिक ऊसबिले दिली आहेत.

राज्य सरकारने २०२०-२१ मध्ये ३०,६२९.६६ कोटी रुपये, २०१९-२० मध्ये ३५,८९८.८५ कोटी रुपये, २०१८-१९मध्ये ३३,०४८.०६ कोटी रुपये आणि २०१७-१८ मध्ये ३५,४४४.०६ कोटी रुपयांची ऊस बिले अदा केली आहेत.

चालू गळीत हंगामात ११९ साखर कारखान्यांनी २९९.०६ लाख टन ऊसाचे गाळप करून २८.९१ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. गळीत हंगाम २०१९-२० मध्ये सहभागी झालेल्या सर्व ११९ कारखान्यांनी शंभर टक्के बिले अदा केली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here