उस शेतकर्‍यांना स्पर्धेत पारितोषिक मिळवण्याची संधी

मेरठ(उत्तर प्रदेश ) : उत्तर प्रदेशातील ऊस शेतकर्‍यांना योगी सरकार पुन्हा एकदा प्रोत्साहित करणार आहे. सरकार ने ऊस शेतकर्‍यांसाठी स्पर्धेचे आयोजन कले आहे. यामध्ये प्रति हेक्टर चांगले आणि अधिक ऊस पीक घेणार्‍या शेतकर्‍यांना पारितोषिक देवून गौरविण्यात येईल.

राज्याचे ऊस आयुक्त संजय आर. भूसरेड्डी यांनी यासाठी सर्व अधिकार्‍यांना आवश्यक सूचना दिल्या आहे. आणि याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. या स्पर्धा तीन टप्प्यात घेतल्या जातील. या टप्प्यांवर यशस्वी होणार्‍या ऊसशेतकर्‍यांना सन्मानित केले जाईल.

स्पर्धेच्या तयारीच्या बाबतीत मेरठचे उप ऊसआयुक्त राजेश मिश्र यांच्या म्हणण्यानुसार , शेतकर्‍यांना यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. तसेच त्यांना याबाबतच्या जागृतीसाठी अभियानाचे आयोजनही केले जाईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here