उत्तर प्रदेश: नैसर्गिक शेतीसाठी मॉडेल फील्ड तयार करणार

बिजनौर : ऊस विभागही आता नैसर्गिक शेतीवर जोर देत आहे. यासाठी विभागाने निवडक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. याचे मॉडेल फिल्ड तयार करण्यात येत असून तेथे शेतकऱ्यांना भेट देण्याची संधी दिली जाईल. विभागाने साखर कारखान्यांच्या मदतीने शेतकऱ्यांची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. ऊस तथा साखर मंत्री, साखर आयुक्त विभागाने अधिकाऱ्यांना तसेच साखर कारखान्यांना या प्रक्रियेचे निर्देश दिले आहेत. बिजनौरसह इतर जिल्ह्यांतील ऊस अधिकारी व साखर कारखानदारांना योजनेचे काम सुरू करण्यात सांगण्यात आले आहे.

अमर उजालामधील वृत्तानुसार, साखर कारखान्यांच्या सहयोगाने शून्य बजेट शेती करण्यासाठी शेतकरी निवडले जातील. जिल्हा ऊस अधिकारी पी. एन. सिंह यांनी सांगितले की, मार्गदर्शनपर मेळावे घेवून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीविषयक माहिती दिली जाईल. असे शेतकरी आपल्या शेतांमध्ये रासायनिक खते, औषधे, किटकनाशके यांचा वापर करणार नाहीत. नैसर्गिक पद्धतीने तयार झालेले खत, शेणखत, जैविक किटकनाशकाचा वापर केला जाणार आहे. बिलाई साखर कारखान्याचे ऊस विभागाचे सरव्यवस्थापक जयवीर सिंह यांनी सांगितले की, गेल्या हंगामापासून दहा शेतकरी नैसर्गिक शेती करीत आहेत. यावेळी पन्नास शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here