ऊस एफआरपी न भागवणाऱ्या कारखान्यांना कारवाईचा इशारा

111

बिजनौर(उत्तर प्रदेश) : शेतकऱ्यांना वेळेत ऊस एफआरपी न देणाऱ्या कारखान्यां विरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाप्रशासनाने पुन्हा एकदा दिला आहे.

येथील कॅम्प कार्यालयात कारखाना अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा इशारा देण्यात आला. यावेळी बोलताना डीएम रमाकांड पांडेय म्हणाले, आता गाळप हंगामही संपत आला आहे, तरीही कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी भागवलेली नाहीत. आता शेतकरी ऊसाच्या लागवडीची तयारी करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना पैशाची गरज आहे.

डीएम म्हणाले, साखर विकून मिळणाऱ्या पैशांनी शेतकऱ्यांची देणी भागवावी. ऊस थकबाकी हा एक महत्वपूर्ण मुद्दा बनला आहे. पैसे न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. लवकरात लवकर शेतकऱ्यांची देणी भागवण्याबाबत प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here