उत्तर प्रदेश : वर्षाला उसाची ८० लाख रोपे बनवून महिला बनल्या स्वावलंबी

मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशात महिला गट आता ऊस लागवडीतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. ऊस विभागाने या कामात महिला बचत गटांना सामावून घेत त्यांच्याकरवी रोपांची निर्मिती सुरु केली आहे. यातून ऊस उत्पादनात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यात ३६६१ महिला ऊस लागवडीद्वारे जोडल्या गेल्या आहेत. शरद ऋतूतील २३.५१ लाख रोपे महिलांनी तयार केली आहेत. शेतकऱ्यांना उसाचे एक रोप ३ रुपयांना दिले जाते. तर सरकार महिलांना प्रत्येक रोपावर १.३० रुपयांचे अनुदान देते.

मुझफ्फरनगरमध्ये उसाची रोपे तयार करणाऱ्या महिलांचे १४७ गट आहेत. या कामाचा योग्य फायदा होत असल्यामुळे महिला आपल्या कुटुंबाला देखील हातभार लावत आहेत. रोपे तयार करणाऱ्या ऊस विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्यात महिला गट तयार करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील महिला दोन वेळा उसाची रोपे तयार करतात आणि नंतर ही रोपे शेतकऱ्यांना विकली जातात. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील महिला गटाने एका वर्षात ८० लाख उसाची रोपे तयार केली आहेत. पूर्वी आमच्या येथील महिला घरात काम करत होत्या. पण आता ऊसाची रोपे तयार करून अतिरिक्त उत्पन्न मिळवत आहेत असे महिला गटाशी संबंधित असलेल्या सोनिया चौहान यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here