उत्तराखंड विधानसभा हंगाम 2020: हातामध्ये उस घेवून पोचले काँग्रेस आमदार

112

सध्याच्या गाळप हंगामामध्ये ऊस दर घोषित करणे आणि शेतकर्‍यांना थकबाकी भागवण्याच्या मागणीबाबत काँग्रेस आमदारांनी आंदोलन केले. मंगलौर चे आमदार काजी निजामुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे आमदार हातामध्ये ऊस घेवून विधानसभेत पोचले. पण मुख्य गेटवर सुरक्षा रक्षांनी आमदारांना विधानसभा परिसरामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले. दरम्यान आमदार आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली.

मंगळवारी काँग्रेस आमदार काजी निजामुद्दीन, फुरकान अहमद, ममता राकेश, आदेश चौहान, हरीश रावत, मनोज रावत हातामध्ये ऊस घवून विधानसभेत आले. रिस्पना पुलाजवळा बैरिकेडिंग वर पोलिसांनी आमदारांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण आमदार सरकारविरोधात घोषणाबाजी करत विधानसभेच्या मुख्य गेटपर्यंत पोचले. ऊस घेवून विधानसभा परिसरामध्ये जाण्यापासून थांबवले गेल्यावर पोलिस आणि आमदारां मध्ये धक्काबुक्की झाली.

आमदार काजी निजामुद्दीन यांनी सांगितले की, गाळप हंगाम सुरु झाला आहे. पण सरकारने आतापर्यंत ऊस दर घोषित केलेला नाही. तर साखर कारखान्यांवर ऊस थकबाकी देय आहे. काशीपुर व इकबालपूर साखर कारखान्यांवर 200 करोड देय आहे. सध्या डीजल, विज, उर्वरक, कीटकनाशकाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. पण प्रदेश सरकारने ऊसाच्या किमतीत कोणतीही वाढ केलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here