उत्तराखंड: ऊस दरवाढीच्या मागणीसाठी काँग्रेसच्या आमदारांचे धरणे आंदोलन

डेहराडून : उत्तराखंडमध्ये ऊस दरासाठीचे आंदोलन विधानसभेच्या दारात पोहोचले आहे. विधानसभा अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी ऊस दरवाढीच्या मागणीसाठी काँग्रेसच्या आमदारांनी आवारात धरणे आंदोलन केले.
आमदार प्रितम सिंह, करण मेहरा, काजी निजामुद्दीन, ममताऊ राकेश, आदेश चौहान आदींसह आमदार या आंदोलनांमध्ये सहभागी झाले.

डिझेल, पेट्रोलचे दर सातत्याने वाढत आहेत. मात्र, सरकार उसाचा दर वाढवत नसल्याबद्दल काँग्रेसच्या आमदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. राज्यात शेतीची आणि शेतकऱ्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. मात्र, सरकारला त्याबद्दल काहीच फिकीर नसल्याची टीका आंदोलक आमदारांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here