उत्तराखंड: पाण्याअभावी ऊस वाळू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता

पथरी : अवकाळी पावसाने अलिकडेच गहू आणि मोहरीच्या पिकाचे मोठे नुकसान केले. मात्र, दुसरीकडे पावसाअभावी ऊस पिक वाळण्याच्या मार्गावर आहे. गंगा नदीच्या कालव्यातून पाणी न मिळाल्याने इतर पिकांच्या पेरणीसाठी उत्तराखंडमधील शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. पथरी विभागातील ऊस पिकाला सध्या पाण्याची गरज आहे. बहुतांश पिकाला पाणी मिळत नसल्याने ऊस पिवळा पडत आहे. गंगा कालवातील पाण्यावर सिंचन करणारे शेतकरी अद्याप पाण्याची प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून येत आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उत्तर प्रदेश सिंचन विभागाकडून अद्याप गंगा नदीच्या कालव्यात भरपूर पाणी सोडण्यात आलेले नाही. शेतकरी अनिल कुमार, प्रमोद चौहान, अनिल चौहान, भोपाल चौहान यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश सिंचन विभागाचे कर्मचारी पाणी सोडण्यास उशीर करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वेळेवर पाणी सोडले गेले नाही तर पिकाच्या उत्पादनात मोठी घट येऊ शकते. घिससुपुरा, बहादरपूर जट, अम्बुवाला, इब्राहिमपूर, एककड कला, फेरुपूर, पदार्था, धनपुरा, झाबरी, चांदपूर, किशनपूर, पंजनहेडी, मिस्सरपूर, अजितपूर आदी गावातील शेतकरी गंगा कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here