उत्तराखंड: थकीत ऊस बिले लवकर देण्याची शेतकऱ्यांची मागणी

रुडकी : शेतकरी संघटनेच्या बैठकीत थकीत ऊस बिले लवकरात लवकर देण्याची मागणी करण्यात आली. सर्व ग्राहकांना ३०० युनिट वीज मोफत दिली जावी अशी मागणीही उपस्थितांनी केली.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, प्रशासकीय भवनात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भुल्लन सिंह होते. जिल्हाध्यक्ष कर्मवीर सिंह यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. यावेळी शेतकऱ्यांनी थकीत ऊस बिले लवकर मिळावीत अशी मागणी केली. शेतकऱ्यांशी संबंधित महसुली प्रकरणे लवकर मार्गी लावावीत, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर उत्तराखंडमधील कुपनलिकाधारकांना मोफत वीज मिळावी आणि ग्राहकांना ३०० युनिट मोफत वीज देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here