उत्तराखंड: बाजपूर कारखान्याकडून शेतकऱ्यांची शंभर टक्के ऊस बिले अदा

उधमसिंह नगर : कोरोनाच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन सरकारच्यावतीने शेतकऱ्यांना उसाची सर्व बिले अदा करण्यात आली आहेत. त्यामुळे बाजपूर साखर कारखान्याने स्वतःकडील आणि शासनाकडून आलेल्या निधीतून ५१ कोटी ९२ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन सरकारच्यावतीने यासाठी अनुदान देण्यात आले आहे.

कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक प्रकाश चंद्र यांनी सांगितले की, समितीकडून गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये विविध सहकारी ऊस विकास समित्यांच्या माध्यमातून ३४४८२१७.८२ लाख क्विंटल ऊस खरेदी करण्यात आला होता. त्यापोटी ५९ कोटी २८ लाक ५९ हजार रुपयांची ऊस बिले आधीच देण्यात आली. मात्र ऊस बिलांची थकबाकी लक्षात घेऊन उत्तराखंड शासनाकडून मागणीनंतर ५१ लाख ७३ कोटी ६८ हजार रुपयांचा धनादेश सहकारी ऊस विकास समित्यांना देण्यात आला. ऊर्वरीत पैसे देण्यासाठी सरकारने केलेल्या मदतीबद्दल मुख्य व्यवस्थापकांनी उत्तराखंड सरकारचे आभार मानले आहेत. दरम्यान, यंदा कारखान्याचा उतारा १०.६० टक्के राहीला. तर तीन लाख ६४ हजार ८१८ पोती साखर उत्पादन करण्यात आले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यापुढील काळातही कोणतीही अडचण येऊ देणार नाही असे आश्वासन सरकारने दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here