उत्तराखंड: प्रगत ऊस तंत्रज्ञानासाठी बैठकांचे आयोजन

डेहराडून : डोईवाला साखर कारखान्याच्या ऊस विकास विभागाकडून डेहराडून परिसरात प्रगत ऊस तंत्रज्ञानासाठी बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांसोबत बियाणे बदल करुन उसाच्या सुधारित उत्पादनासाठी बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.

याबाबत लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, डोईवाला आणि खैरी येथे शेतकऱ्यांसोबत बैठका होणार आहेत. डेहराडून को-ऑपरेटिव्ह शुगरकेन डेव्हलपमेंट सोसायटीच्या आवारात साखर कारखान्याच्या ऊस विकास विभागातर्फे सबावला पंचायत भवन आणि त्यानंतर सहसपूर येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली जाणार आहे. याबाबत माहिती देताना साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. पी. सिंग म्हणाले की, ऊस विकास विभाग आणि साखर कारखान्याच्या उन्नतीसाठी या बैठका महत्त्वाच्या आहेत. बैठकीत शेतकर्‍यांच्या समस्या ऐकून त्यांना चांगल्या प्रतीचा ऊस लावणीबाबत सूचना करण्यात येणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here