रुडकी : लक्सर साखर कारखान्याने मार्चच्या सुरुवातीच्या वीस दिवसात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या ऊसापोटी ५७.५९ कोटी रुपयांच्या ऊस बिलांचा धनादेश ऊस समित्यांकडे पाठवला आहे. समित्या पुढील पाच दिवसात हा धनादेश शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करतील.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, लक्सरस्थीत आरहबीएनएस साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. पी. सिंह यांनी सांगितले की, कारखाना प्रशासनाने चालू गळीत हंगामात २८ फेब्रुवारीपर्यंत ज्या शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केला, त्यांचे पैसे देण्यात आले आहेत. आता १ मार्च ते २० मार्च या कालावधीतील १६ लाख २२ हजार क्विंटल ऊस खरेदी करण्यात आला होता. त्याचे ५७.५९ कोटी रुपये लक्सर, ज्वालापूर, इकबालपूर व लिब्बरहेडी ऊस समित्यांना देण्यात आले आहेत. लक्सर ऊस समितीचे प्रभारी सचिव सुरजभान सिंह यांनी धनादेश मिळाल्याचे सांगितले. लवकरच समितीच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होईल असे ते म्हणाले.