रुद्रपूर : राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याऐवजी त्वरीत थकीत ऊस बिले द्यावीत, अशी मागणी शेतकरी नेते डॉ. गणेश उपाध्याय यांनी केली आहे. उत्तराखंडच्या किच्छा साखर कारखान्याने ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऊस उत्पादकांना बिले दिली आहेत, असे त्यांनी सांगितले.
लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक त्रिलोक सिंह मर्तोलिया यांच्या म्हणण्यानुसार, साखर कारखाना शेतकऱ्यांच्या सहकार्याने चांगल्या दर्जाची साखर उत्पादन करीत आहे. किच्छा साखर कारखान्याने आपल्याकडील नियोजनानुसार ३० नोव्हेंबरच्या पुढील बिले देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या सोबतच ३० नोव्हेंबरपर्यंतची बिले ऊस समित्यांना दिली आहे. तर काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ, उपाध्याय यांनी शेतकऱ्यांना अद्याप नोव्हेंबरची ऊस बिले मिळाली नसल्याचे सांगितले.