वडोदरा मध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

154

वडोदरा:  वडोदरामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत 6 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. शहरात बुधवारी तब्बल 12 तासात 442 मिमी पाउस झाला. यामुळे विमानसेवा आणि काही रेल्वे देखील रद्द करण्यात आल्या.

काही परिसरामध्ये घरात पाणी घुसल्यामुळे सरकारने त्या भागातील नागरीकांचे इतर ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या. सूरत, पंचमहल आणि अहमदाबाद मध्येही मोठ्या प्रमाणात पाउस झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसात गुजरामधील काही भागात अधिक मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here