भाकियूने साखर कारखान्यांना दिली 17 ऑगस्टची डेडलाइन

97

मुजफ्फरनगर: जिल्हा ऊस अधिकारी कार्यालयावर कारखाना महाव्यवस्थपक आणि त्यांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या भाकियूच्या बैठकीमध्ये राकेश टिकैत यांनी घोषणा केली की, जर साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना व्याजासहित थकबाकी दिली नाही तर 17 ऑगस्ट ला प्रत्येक कारखाना क्षेत्रात शेतकरी थान्यावर जनावरांसह धरणे आंदोलन करतील.
गुरुवारी डीसीओ कार्यालयावर ऊस थकबाकीबाबत बैठक झाली. बैठक़ीमध्ये एडीएम प्रशासन अमित कुमार, पोलिस अधिक्षक सतपाल अंतिल, डीसीओ डॉ. आरडी द्वीवेदी यांच्या शिवाय जिल्ह्यातील सर्व साखर कारखाना प्रतिनिधींनी सहभाग घेतला. जिल्ह्यामध्ये शेतकर्‍यांची 994 करोड रुपये थकबाकी देय आहे. ही थकबाकी मिळण्याच्या मागणीसाठी भाकियूचे आंदोलन सुरु आहे. भैसाना बजाज साखर कारखान्यावर 273 करोड रुपये देय आहेत. भाकियू कार्यकर्ते गेल्या चार दिवसांपासून बुढाना कोतवालीमद्ये धरणे आंदोलन करत आहेत. बैठक़ीमध्ये साखर कारखाना व्यवस्थापकांच्या मनमानीमुळे कोणताही तोडगा निघालेला नाही.

भाकियू प्रवक्ता राकेश टिकैत यांनी सांगितले की, 17 ऑगस्ट ला सर्व साखर कारखान्यांशी संबंधित थान्यांवर भाकियू आंदोंलन करेल. त्यांनी सर्व शेतकर्‍यांना आपल्या जनावरांसहित थान्यावर पोचण्याचे आवाहन केले आहे. बुढाना कोतवाली वरचे धरणे आंदोलन सुरुच राहिले. भाकियू मंडल महासचिव राजू अहलावत, नवीन राठी, जिल्हाध्यक्ष धीरज लाटियान, देव अहलावत, धमेंद्र मलिक, नीटू, अनुज बालियान, ओंकार सिंह, सुरेश पाल आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here