साखर कारखाना विस्तारीकरणासाठी आंदोलनाला गती देण्याचा भाकियूचा निर्णय

76

नजीबाबाद : साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या प्रश्नाने आता गती घेतली आहे. या प्रश्नी २१ सप्टेंबर रोजी बिजनौर येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ऊस मंत्री सुरेश राणा यांच्या उपस्थितीत नजीबाबाद साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत शेतकरी सहकारी साखर कारखाना नजीबाबादचे विस्तारीकरण करण्यात येईल अशी घोषणा केली होती असे शेतकऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही साडेतीन वर्षात काहीच झालेले नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत. भारतीय किसान युनियनचे माजी विभागीय उपाध्यक्ष चौ. बलराम सिंह, तालुकाध्यक्ष सरदार इक्बाल सिंह, विनोद परमार, भोपाल सिंह, अध्यक्ष प्रशांत चौधरी आंदीसह अनेक शेतकऱ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयाच्या समोर कारखान्याच्या विस्तारीकरणाबाबत धरणे आंदोलन केले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे असलेले निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात देण्यात आले. या निवेदनात शेतकऱ्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष वाल्मिकी, बिजनौरचे भाजप आमदारांचे पती ऐश्वर्य चौधरी, भाजप नेते राजीव अग्रवाल यांनी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाबाबत शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन फोल ठरल्याबद्दल या भाजप नेत्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाबाबत सरकार आणि लोकप्रतिनिधींची खोटी आश्वासने दिसत असल्याचे सांगत भाजपच्या कार्यालयावर २१ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन आणि कार्यालयाला घेराव घालण्याचे आंदोलन केले जाईल असा निर्णय जाहीर केला. शेतकऱ्यांनी बिजनौरमध्ये आंदोलनासाठी यावे यासाठी संपर्क अभियान सुरू करण्याचा निर्णय घेत, आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी यावे असे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या या बैठकीला राकेश कुमार, जोगेंद्र सिंह, गुरुदेव सिंह, सतेंद्र सिंह, अर्जुन सिंह यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here