वर्धन ॲग्रो कारखाना कार्यस्थळावर ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोषोने वातावरण भक्तीमय

सातारा : वर्धन ॲग्रो कारखाना कार्यस्थळावर सालाबादप्रमाणे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे पायी चालत जाणारी श्री शेकोबादादा दिंडी विश्रांतीसाठी विसावली. यावेळी ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोषोने वातावरण भक्तीमय झाले होते. सातारा तालुक्यातील जिहे येथून शिरसवडी मार्गे जाणाऱ्या या दिंडीचे भाजप जिल्हाध्यक्ष तथा वर्धन ॲग्रो कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी स्वागत केले. कदम यांनी पालखीचे दर्शन घेऊन टाळ मृदंगाच्या साथीत वारकऱ्यांच्या अभंगावर ठेका धरला.

चेअरमन धैर्यशील कदम यांनी वारकऱ्यांशी सुसंवाद साधला. दिंडीसाठी जाताना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्या शासनाच्या माध्यमातून सोडवू, वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. यावेळी चेअरमन धैर्यशील कदम यांनी जेष्ठ दिंडी चालक नारायण बापू, हणमंत वेर्णेकर, विठ्ठल जिहेकर, हभप रवींद्र फडतरे, कृष्णत केंजळे, बाबा पवार, सुनील माने, विठ्ठल फडतरे, नानासाहेब निकम, आप्पासाहेब निकम यांचा सन्मान केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here