उदगिरी साखर कारखान्यावर वृक्षारोपण, रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रम

सांगली:उदगिरी कारखान्याचे अध्यक्ष डॉ.राहुल कदम यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नेते वनश्री माजी आमदार मोहनराव कदम आणि उदगिरी कारखान्याचे संस्थापक डॉ.शिवाजीराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर विविध कार्यक्रम आयोजित केले होते. कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपणाच्या उपक्रमासह रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.कारखाना स्थळावर, कॉलनी परिसरामध्ये पावसाळ्यात दोन हजार झाडे लावण्यात येणार आहेत. भारती ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शिबिरात कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले, अशी माहिती संचालक उत्तम पाटील यांनी दिली.वनश्री माजी आमदार मोहनराव कदम आणि डॉ.शिवाजीराव कदम यांना वृक्षांची फार आवड असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियोजनानुसार कारखाना कार्यस्थळावर १० हजारांपेक्षा जास्त फळे, फुले, विविध शोभिवंत झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here