आजरा साखर कारखाना अध्यक्षपदी वसंतराव धुरे

कोल्हापूर: गवसे येथील आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी वसंतराव धुरे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उपाध्यक्षपदी तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष एम. के. देसाई यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रवळनाथ शेतकरी विकास आघाडीने निर्विवाद सत्ता मिळवली आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. मुश्रीफ यांनी दिलेल्या बंद पाकिटातील नावे उघडण्यात आली. यामध्ये धुरे व देसाई यांची निवड करण्याची सूचना होती. निवडीनंतर धुरे म्हणाले की, सध्या कारखाना आर्थिक अडचणीत आहे. नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार काटकसर व पारदर्शक पद्धतीने कारभार केला जाईल. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, मुकुंदराव देसाई, विष्णुपंत केसरकर, उदय पवार, रणजित देसाई, दीपक देसाई, राजेंद्र मुरूकटे, रचना होलम, हरिबा कांबळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here