देशात शंभर टक्के इथेनॉलवर चालणार वाहने, सरकारने केली तयारी

नवी दिल्ली : सरकारने इंधन म्हणून फक्त इथेनॉल वापराचे उद्दीष्ट ठेवले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी याबाबत शुक्रवारी माहिती दिली. ते म्हणाले, भारताने २०२३-२४ पप्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. मात्र, याचे उंतिम लक्ष्य शंभर टक्के इथेनॉलवर आहे.

मंत्री गोयल म्हणाले, देशाने गतीने प्रगती करण्यासाठी नवऊर्जेची गरज आहे. बॅटरी जोडलेल्या उद्योगांचे महत्त्व आता अधिक असेल. यासाठी देशात आता बॅटरीवर अधिक गुंतवणूक केली जात आहे.

भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) आत्मनिर्भर भारत संमेलनात मंत्री गोयल म्हणाले, २०२३-२४ पर्यंत भारत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करेल. आमचे अंतिम उद्दीष्ट अशा वाहनांचे आहे, ज्यामध्ये शंभर टक्के इथेनॉल असेल.
मंत्र्यांनी सांगितले की इलेक्ट्रिक कारच्या वापरकर्त्यांना दिवसा सौर ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाईल. आम्ही देसभर गॅस स्टेशनवर चार्जिंग स्टेशन सुरू करण्याच्या विचारात आहोत. गोयल म्हणाले, २०२२ पर्यंत १७५ गीगावॅटच्या एकूण नव ऊर्जा प्राप्त करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. भारताने २०३० पर्यंत ४५० गीगावॅट उर्जा मिळविण्याचे ठरवले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here