व्हायब्रंट गुजरात : इथेनॉल निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक

75

गांधीनगर : गुजरात सरकारने प्री-व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये (pre-Vibrant Gujarat Global Summit) एक भाग म्हणून कृषी, कृषी प्रक्रिया आणि कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात २,३५९ कोटी रुपयांचे आठ सामंजस्य करार (एमओयू) केले आहेत. यामध्ये इथेनॉल निर्मिती क्षेत्रात सर्वाधिक १३४२ कोटी रुपयांचे तीन करार करण्यात आले. कंपन्यांनी राज्यात भात, मक्क्यापासून इथेनॉल निर्मितीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.

नवी दिल्लीतील आरएलजी ग्रुपच्या लुना केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडने प्रती दिन ५,००,००० लिटर क्षमतेसोबत एक इथेनॉल युनिट स्थापन करण्यासाठी ६५० कोटी रुपये गुंतवणूकीचा करार केला आहे. कंपनीचे गुजरातमध्ये दोन ठिकाणी प्लांट आहेत. यामध्ये अंकलेश्वरमध्ये एक तर दुसरा दहेज येथे आहे. येथील उत्पादनांमध्ये अॅसिटिक एनहायड्रॉइड, पूर्ण अल्कोहोल, इथील अल्कोहोल, नायट्रोबेंझीन यांचा समावेश आहे. युपीएलने ५,००,००० एलपीडी क्षमतेच्या प्लांटसाठी ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे. तिसरी कंपनी आमन्या ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमियेडने १,५०,००० एलपीडी इथेनॉल प्लांट सापन करण्यासाठी १९२ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here