व्हिएतनाम: थायलंडमधून आयात साखरेवर ३४ टक्के अँटी डम्पिंग टॅक्स

109

हनोई : थायलंडमधून आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या साखरेवर अँटी डम्पिंग टॅक्स लागू करण्याचा प्रस्ताव असल्याचे व्हिएतनामने स्पष्ट केले आहे. थायलंडमधून साखर आयात केली जात असल्याने त्याचा विपरीत परिणाम स्थानिक साखर उद्योगावर झाल्याचा दावा व्हिएतनामने केला आहे.

व्हिएतनामच्या उद्योग आणि व्यापार मंत्रालयाने सांगितले आहे की, थायलंडच्या साखरेवर ३३.८८ टक्के लेव्ही लावण्यात येणार आहे. मात्र याची अंमलबजावणी कधी होईल आणि याची कालमर्यादा किती असेल याची निश्चिती अद्याप करण्यात आलेली नाही. व्हिएतनामने २०२० मध्ये दक्षिण पूर्व आशियातील देशांकडून आयात केल्या जाणाऱ्या साखरेवरील आयात शुल्क एटीआयजीए (माल सामंजस्य करार) मध्ये आशियाई व्यापार तरतुदींनुसार हटविण्यात आले होते. मात्र, आशियाई देशांशी असलेल्या प्रतिस्पर्धात्मक व्यापार व्यवहाराच्या विरोधात आपल्या देशांतर्गत उद्योगांचे अधिकार आणि हितांचे रक्षण करताना अशा प्रकारे आयात शुल्क लावण्यास अनुमती आहे. त्यामुळे व्हिएतनाम सरकारने हा निर्णय घेतला आहे.
व्हिएतनामच्या व्यापार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, थाडलंडमध्ये २०२० मध्ये १.३ मिलियन टनाच्या साखरेचे डंपिंग झाले आहे. याआधीच्या २०१९ च्या तुलनेत ही साखरेची आयात ३३०.४ टक्के जास्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here