स्थानिक साखर बाजारपेठ व्यवस्थापित करण्याच्या उपायांना व्हिएतनामचे प्रोत्साहन

हनोई : उद्योग व व्यापार मंत्री ट्रॅन तुआन अन यांनी एजन्सीना व्यापार उपाय, आयात व निर्यात व्यवस्थापन यावरील उपायांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आणि साखर उत्पादनांसाठी बाजारपेठ व्यवस्थापन बळकट करण्यास प्रोत्साहन दिले.
आंतरराष्ट्रीय प्रतिबद्धतांनुसार, आयात केलेल्या साखर उत्पादनांसाठी व्यापार उपायांचा वापर करण्यासंदर्भात मंत्र्यांनी व्यापार उपाय प्राधिकरणाला बाजारपेठेवर सक्रियपने नजर ठेवण्यास विंनंती केली.

त्याचबरोबर प्राधिकरण व्यापार संरक्षण नोंदी तयार करण्याच्या व्यवसायांना समर्थन देण्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे साखर आयात, निर्यात आणि उत्पादन यावर एक समकालीन आणि अचूक डेटाबेस स्थापित करेल. यावर्षी आयात निर्यात विभागाला साखर उत्पादनांच्या आयात निर्यात कार्यासाठी व्यवस्थापन पद्धतीवरील प्रस्ताव पूर्ण करण्यास सांगितले आहे.

या सामान्य विभागाने साखर आणि गोड पदार्थ उत्पादनांसाठी होणारी तस्करी आणि व्यावसायिक फसवणूक रोखण्यासाठी आणि काटेकोरपणे हाताळण्यासाठी व्यवस्थापन आणि तपासणी अधिक मजबूत करणे आवश्यक असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
उद्योग अणि व्यापार मंत्रालयाच्या उपायाद्वारे देशांतर्गत साखर उत्पादनाचे संरक्षण करणे, व्यवसायाचे वातावरण निर्माण करणे आणि स्थानिक साखर उत्पादकांची स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी अधिक अनुकूल परिस्थिती आणणे अपेक्षित आहे.

व्हिएतनामने 7.3 दशलक्ष टन ऊसाचे उत्पादन केले आणि 2019-2020 च्या ऊस पिकांमधुन मे 2020 मध्ये संपलेल्या हंगामात  एकूण उत्पादन सुमारे 769,000 टन इतके होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here