व्हिएतनाममध्ये तोट्यातील कारखाने बंद करणार

नवी दिल्ली : चीनी मंडी

भारत आणि ब्राझीलमधील साखर उद्योग सध्या आर्थिक संकटातून जात आहे. त्याचवेळी जगातील इतर देशांमध्येही फारशी समाधानकारक परिस्थिती नाही. साखर उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या देशांपैकी एक असलेल्या व्हिएतनाममध्ये साखर उद्योगाची घसरण सुरू आहे. आककडेवारीनुसार गेल्या पंधरा वर्षांतील ही सर्वांत मोठी घसरण आहे. व्हिएतनामच्या २०२० पर्यंतच्या साखर उद्योगाच्या धोरणानुसार देशातील तोट्यात असणारे साखर कारखाने बंद केले जाणार आहेत. त्यामुळे २०२५ पर्यंत देशात सध्याच्या ४० पैकी केवळ १५ कारखानेच सुरू राहतील.

व्हिएतनाममध्ये साखर कंपन्यांचे आर्थिक वर्षे जुलै ते जून असे असते. साखरेच्या कंपन्यांकडून नुकतीच जाहीर करण्यात आलेली आकडेवारी धक्कादायक आहे. लाम सन सुगर (एलएसएस) या कंपनीच्या अहवालानुसार त्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्यांचा महसूल सहा टक्क्यांनी वाढला आहे.

त्यानंतरही सध्याच्या तिमाहीत त्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. व्यवस्थापन, विक्री आणि इतर आर्थिक खर्चाच्या बोजामुळे कंपनीला १०.४ अब्ज व्हिएतनाम डॉलरचा तोटा सहन करावा लागत आहे. सगळे कर भरल्यानंतरचा एलएसएसचा नफा २०१७-१८च्या वर्षात ४ अब्ज रुपयांच्या खाली घसरला आहे. १ हजार ४५२ कोटी व्हिएतनाम डॉलर एकूण महसूल कंपनीकडे जमा झाला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात तब्बल ३९ कोटी व्हिएतनाम डॉलरची घसरण झाली आहे.

कासुको या कंपनीलाही अशाच नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या आर्थिक अहवालानुसार त्यांना एक हजार ६५ कोटी व्ही डॉलरचा महसूल मिळाला असला तरी त्यांना सर्व कर वाज करून त्यांना केवळ तीन अब्ज १० कोटी व्ही डॉलरचा निव्वळ नफा झाला आहे. यातील महसूलाची घसरण २१.५ टक्क्यांची तर, नफ्यातील घसरण ९५.५ टक्क्यांची आहे. दी कोन तूम शुगर कंपनीनेही त्यांच्या नफ्यात ७८ टक्क्यांची घसरण होऊन नफा ९ अब्ज रुपयांपर्यंत घसरल्याचे सांगितले. व्हिएतनामधील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या थान्ह थान्ह कोंग बीन होअ या कंपनीच्या नफ्यातही घलरण झाली आहे. या कंपनीकडे व्हिएतनाममधील सर्वांत मोठी गाळप क्षमता आहे. या कंपनीचा महसूल १० हजार ३६४ कोटी
व्हिएतनाम डॉलर होता. थान्ह थान्ह कोंग आणि बीन होअ या दोन स्वतंत्र कंपन्यांच्या महसुलाचा विचार केला, तर हे आकडे खाली येतात. व्हिएतनाममध्ये साखर उद्योगाला पहिला फटका १९९९मध्ये बसला. साखर उद्योगाला सुरुवात झाल्यानंतरच अवघ्या चार वर्षांतच ही परिस्थिती उद्भवली. यात अनेक कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या. तीच परिस्थिती पुन्हा
उद्भवली असून, यंदा त्याची तीव्रता अधिक आहे. साखरेचा अतिरिक्त पुरवठा आणि कमी मागणी यामुळे साखर उद्योगावर प्रचंड मोठा ताण आल्याचे दिसत आहे. व्हीएसएसएच्या अहवालानुसार जुलैमध्ये जागतिक बाजारात साखरेचे दर प्रति टन १७.७५ डॉलरने घसरले आहेत. गेल्या महिन्यात हेच तर प्रति टन ३१७.८५ डॉलरने घसरले आहेत. जगातील साखर उत्पादन दहा टक्क्यांनी वाढल्याने किंवा मागणीच्या प्रमाणात दोन टक्के जास्त उत्पादन होत असल्याने साखरेच्या दरात इतकी मोठी घसरण होत आहे. त्यामुळे व्हिएतनाममधील कंपन्यांना आता साखर उत्पादक देशांतून होणाऱ्या आयातीशी स्पर्धा करावी लागणार आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here