व्हिएतनाम करणार थायलंडच्या ‘शुगर टैक्स’चा आढावा

हनोई : व्हिएतनामच्या उद्योग आणि व्यापार मंत्रालयाने सांगितले की, थायलंडच्या काही साखर उत्पादनांवर पाच वर्षासाठी ४७.६४ टक्के अँटी डंपिंग कर लावला आहे. मंत्रालयाने देशांतर्गत उद्योगांच्यावतीने सप्टेंबर महिन्यात सुरू झालेल्या डंपिंग विरोधी तपासानंतर हा निर्णय लागू करण्यात आला आहे. थालयंडने व्हिएतनामकडून साखरेवर लागू केलेल्या आपल्या दंडात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

थायलंडच्या परराष्ट्र व्यापार विभागाचे महासंचालक किराती रशचानो यांनी सांगितले की, व्हिएतनामतर्फे अँटी डम्पिंग कर लागू केल्यानंतर एक वर्षांनी थायलंड, व्हिएतनामला याचा आढावा घेण्यास आणि डब्ल्यूटीओच्या नियमांनुसार नव्याने तपास सुरू करण्यास सांगणार आहे. किराती यांनी सांगितले की व्हिएतनामकडून थायलंडच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि योग्य स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.

व्हिएतनामच्या उद्योग आणि व्यापार मंत्रालयाचा हा निर्णय उद्योगाच्यावतीने गेल्या सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात आलेल्या डंपिंग विरोधी तपासानंतर मंत्रालयाने लागू केला आहे. मंत्रालयाने सांगितले की, तपासानंतर असे लक्षात आले की थायलंडकडून अनुदानावर मिळणारी साखर २०२० मध्ये ३३०.४ टक्के वाढून १२ लाख टन झाली. आयातीमुळे देशातील साखर उद्योग कमकुवत होत होता.

तत्पूर्वी उद्योग मंत्रालयाने फेब्रुवारीमध्ये थालयंडच्या साखर उद्योगावर तात्पुरत्या स्वरुपात ३३.८८ टक्के लेव्ही लागू केली होती. ऊस आणि साखर विभाग तसेच थायलंड शुगर मिल कॉर्पोरेशनच्या कार्यालयाने सांगितले की, डम्पिंग विरोधी करामुळे थायलंडच्या साखर उत्पादक आणि शेतकऱ्यांनावर परिणाम करणार नाही. थायलंड हा जगातील चौथ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. ब्राझीलनंतर तो सर्वात मोठा निर्यातदार आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here