विकास लाईफकेअर बिहारमध्ये उभारणार इथेनॉल प्लांट

पाटणा : विकास लाईफ केअरने बिहार राज्य सरकारच्या इथेनॉल उत्पादन धोरण २०२१ अंतर्गत नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. राज्य सरकारने राष्ट्रीय जैव इंधन धोरण २०१८ ला पूरक असे धोरण विकसित केले आहे. त्या अंतर्गत बिहारमध्ये भागलपूर जिल्ह्यात प्रती दिन ६० किलो लिटर प्रारंभिक क्षमतेचे इथेनॉल निर्मिती युनिट सुरू केले जाणार आहे. त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

राज्य सरकार बिहारला देशातील अग्रगण्य राज्यांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यात येत आहे. इथेनॉल धोरण तयार झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये इथेनॉलवर आधारित युनिट सुरू करण्याचा प्रस्ताव आले आहेत. त्यातील काही प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. अनेक उद्योग समुहांनी इथेनॉल प्लांट सुरू करण्याची तयारी दाखवली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here