अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत्या हंगामात दाखल होणार 12 नवीन हार्वेस्टर मशीन

अहमदनगर: शेतात तयार झालेला ऊस तोडण्यासाठी ऊस मजुरांची गरज असते. शिवाय यासाठी वेळही खूप लागतो. कोरोनामुळे ऊस मजुरही कमी येण्याची शक्यता आहे . त्यातच गाळप हंगाम तोंडावर येवू घातला आहे. आगामी गाळपाच्या पार्श्‍वभूमीवर ऊस तोडणीसाठी लागणारा वेळ वाचवण्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना व प्रवरा बँकेच्या सहकार्याने 12 ऊस हार्वेस्टर मशिन खरेदी करण्यात आले आहेत.

या सर्व मशिन्सची विधिवत पूजा विखे पाटील कारखाना कार्यस्थळावर करण्यात आली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विश्‍वासराव कडू, ट्रक वाहतूक सोसायटीचे अध्यक्ष नंदूकिशोर राठी, प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, संचालक अशोक आहेर, प्रभारी कार्यकारी संचालक अशोक पानगव्हाणे, पोपट वाणी, दिलीप कडू, एस.बी. गायकवाड, सरोज परजणे, जालिंदर खर्डे आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

केन हार्वेस्टर मशिन घेण्याची इच्छा असणार्‍या शेतकरी किंवा कंत्रांटदारांसाठी विखे पाटील वाहतूक सोसायटीच्या पुढाकाराने एक नवी योजना तयार करण्यात आली होती. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना आखण्यात आली होती. योजनेच्या माध्यमातून 12 व्यक्तींनी हे मशिन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार पहिले केन हार्वेस्टर मशिन बाबासाहेब बारेसे यांच्याकडे कंपनीने दिले.

या मशिनमुळे आता ऊस तोडणीला लागणारा वेळ वाचणार असल्याचे ट्रक सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर राठी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here