डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध, विरोधी गटाचे दोन्ही अर्ज बाद

167

अहमदनगर : प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक सलग तिसऱ्यांदा बिनविरोध झाली. माजी मंत्री, भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह २१ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. या वेळी खासदार डॉ. सुजय विखे यांचा मात्र संचालक मंडळात समावेश नाही. त्याऐवजी स्वत: विखे यांचीच निवड करण्यात आली आहे.

अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी विखे गटाकडून ३७ व विरोधी गटाकडून २ असे एकूण ३९ अर्ज दाखल झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल झालेल्या अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये विरोधी गटाचे दोन्ही अर्ज बाद झाले. नंतर १६ इच्छुकांनी माघार घेतली आणि विखे गटाचे सर्व २१ संचालक बिनविरोध निवडून आले. मागील संचालक मंडळात खासदार विखे यांचा समावेश होता, ते अध्यक्षही होते. तेव्हा राधाकृष्ण विखे संचालक मंडळात नव्हते. या वेळी खांदेपालट करण्यात आला आहे.

संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्‍यानंतर कारखाना कार्यस्‍थळावरील सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळसाहेब विखे पाटील यांच्‍या स्‍मृतीस्‍थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here